Breaking News

लाखोंच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चिमूर येथे भव्यसभा ठरली इतिहासिक सभा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या प्रचारार्थ चिमूर येथे आयोजित भव्य सभेला लाखोंच्यावर संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जोशपूर्ण भाषण ऐकण्यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही सभा महायुतीच्या विजयासाठी नवसंजीवनी ठरली आहे, असा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला.

या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आमदार बंटी भांगडीया व सर्व विधानसभा भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या वतीने जोशात करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या ध्येयधोरणांची सखोल माहिती दिली आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी भाजप सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

मोदींनी आपल्या भाषणात आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या योजनांचा आवर्जून उल्लेख केला, ज्यामुळे सभेत उपस्थित नागरिकांचा प्रतिसाद उंचावला. मोदींनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना, तरुणांसाठी नवनवीन रोजगार संधी, तसेच आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी भाजपा सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी नवभारताच्या दिशेने पावले टाकण्याच्या दिशेने विकासाचा संकल्प पुनः दृढ केला. आमदार बंटी भांगडिया यांची चिमूरमधील ही सभा, लोकांच्या उपस्थितीने एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा …

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved