Breaking News

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरला तळोधी (नाईक) येथे आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमुर- श्री. गुरूदेव सेवा मंडळ तळोधी (नाईक) च्या वतीने दि. २४ ते २६ नोव्हेंबर राजी ग्रामगितेचे जनक वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५६ वी पुण्यतिथी महोत्सव तथा सर्व संत स्मृती दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसर्वाधिकारी निलकंठ सुर्यवंशी यांनी दिली.

दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वाजता रामभाऊ वाकडे, महादेवराव सुर्यवंशी, देविदासजी मेश्राम यांचे हस्ते घटस्थापना झाल्यानंतर सामुदायिक प्रार्थना व रात्रो भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्राम सफाई, सामुदायिक ध्यान कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी ९ वाजता महिलांकरीता रांगोळी स्पर्धा व हळदी कुंकु मेळावा आयोजित केला असुन यावेळी मार्गदर्शक म्हणुन गुरूदेव उपासिका रज्जुताई ठाकरे,कमलताई गुडधे, नलिनीताई समर्थ, सिंधुताई वाकडे उपस्थित राहणार आहे. सायं. ६ वाजता होणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेला मार्गदर्शक म्हणुन भक्तदासजी जिवतोडे उपस्थित
राहणार आहे. रात्रो ८ वाजता ह.भ.प. डॉ. प्रा. प्रशांत ठाकरे महाराज व संच अकोला यांचे जाहिर किर्तन आयोजित करण्यात आलेले आहे.

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ग्रामसफाई झाल्यानंतर होणाऱ्या सामुदायिक ध्यानाचे प्रसंगी सरडपारचे सर्वाधिकारी अरविंद देवतळे, गजानन ठाकरे, आनंदराव कडुकर, मंगेशजी मस्के प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सकाळीच ८ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेसह गावातील मुख्य मार्गावरून मिरवणुक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर होणाऱ्या मुख्य समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गुरूकुंज आश्रम मोझरीचे प्रांत सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर, आजीवन प्रचारक प्रा. अशोक चरडे, पांडुरंग दहिकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एम. निखाडे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका निशाताई करमकर, ठानेदार संतोष बाकल, मारोतराव अतकरे, सरपंच मदनलाल येसांबरे, उपसरपंच प्रकाश धानोरकर आदि मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसर्वाधिकारी निलकंठ सुर्यवंशी, उपसर्वाधिकारी आशिष कावरे, सचिव उमदेव गजभे, सहसचिव बंडु गिरी, कोषाध्यक्ष सुनिल खाटे, संघटक अभिषेक सुर्यवंशी, प्रचार प्रमुख सचिन वाकडे, सदस्यगण लिकेश धानोरकर, दुर्योधन खाटे, सुरज राऊत, प्रथमेश श्रिरामे, भगवान गजभे, रामभाऊ वाकडे, नानाजी गजभे, नंदकिशोर मडावी, सुमनबाई श्रिरामे, लिलाबाई रनदिवे, रोशरी शेंडे, धनराज डांगे, वासुदेव शेंदरे, नथ्थु सुर्यवंशी, देवराव मेश्राम, गोपाल कावरे, मधुकर वांढरे व सर्व गुरूदेव भक्तांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस व फोरव्हीलर गाडीचा अपघात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर भिसी राष्ट्रीय महामार्गावर मुंगले यांच्या शेता जवळ एसटी बस …

भिसी पोलीसांनी सापळा रचून पाच जुगार खेळणाऱ्यांना केली अटक

पोलीसांनी ६१,७७५/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- भिसी पोलीसांना बातमीदार मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved