जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात बोडधा येथे हनुमान मंदीर चौकात कॉर्नर सभेमध्ये एका युवकाने विकासकामाबाबत प्रश्न विचारला असता युवकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आले, युवकाने भिसी पोलिस स्टेशन गाठले परंतु त्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही, असा आरोप शंकर रामटेके यांनी पत्रकार परिषदेत केला.
बोडधा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदाशिव घोडमोडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश बरधे, योगेश सहारे, प्रफुल कोलते रा.मांगलगाव यांनी मारहाण केल्याचा आरोप शंकर रामटेके यांनी केला. तक्रार दाखल करण्याकरिता भिसी पोलिस स्टेशन गाठले असता तक्रार दाखल करण्याचे सोडून धमकावून पोलिसांनी परत पाठविल्याचे मेश्राम यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसमोर बयाण घेण्यात आले. त्यानंतरही गुन्हा दाखल न करता उलट तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शंकर मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली.
“उपविभागीय पोलिस अधिकारी -राकेश जाधव“
*बोडधा प्रकरणी चौकशी सुरू असून अनेकांचे बयाण घेणे सुरू आहे. दोन-तीन दिवसांमध्ये सत्यता समोर येईल असे सांगितले*