Breaking News

शेवगाव शहरात रस्ते अपघातात दोन बळी

अविनाश देशमुख शेवगाव

शेवगाव :- सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील आठवडे बाजार बाजार भरविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे तरीही बाजार रस्त्यावर व डिव्हायडरवर भरतो त्यातच आवाक्याच्या बाहेर गेलेली बेशिस्त ट्रॅफिक कोणत्याही चौकात सिग्नल नाही संपूर्ण रस्त्याला अतिक्रमण करून राजकीय मंडळीच्या वरद हस्ताने सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या राजरोसपणे चालू असलेल्या टपऱ्या आणि याकडे अगदी हेतुपुरस्सर पणे फक्त पैसे खाणाऱ्या हरमखोर जबाबदार अधिकारी व कर्मचारी मग ते ट्रॅफिक पोलिस असो,नगरपरिषद चे अधिकारी किंवा कर्मचारी असो, पंचायत समितीच्या अधिकारी असो,किंवा या सर्वावर नियंत्रण असलेले तहसीलदार असो माझ्या नजरेत आजच्या या बेशिस्त वाहतूक मुळे एक प्रसिद्ध वकील व दोन अल्पवयीन मुलांना आपला प्राण गमवावा लागला याचे नुकसान कशाने भरून येईल पुन्हा आज अपघातात मृत्यु झालेले पुन्हा जिवंत होतील का ? आणखी किती बळी जाताना मुकी बहिरी झालेली ही शेवगाव ची जनता कधीतरी इथल्या या शासनाचा भरमसाट पगार खाणाऱ्या आलिशान गाड्या घर प्रॉपर्टी घेणाऱ्या नीच अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी पुढे येईल का? की असेच अजून बळी जाताना फक्त स्मशान भूमी पर्यंत पोहोचवणार आणि त्यांच्या घरच्या लोकांना पोकळ नकली सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहणार हा मला पडलेला प्रश्न आहे,मी गप्प बसणार नाही भलेही माझ्या मागे मुर्दाड मानसिकतेचे लोक येणार नाहीत पण ज्यांना माझा हे मांडलेल खरं वाटत असेल तर माझे आवाहन आहे.

आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी लढा देऊया यामध्ये आपण साथ द्या यापुढे बळी जाणार नाहीत त्यासाठी छोटा प्रयत्न करूयात उद्या सकाळी ठीक ११ वाजता पोलिस स्टेशन शेवगाव व तहसीलदार शेवगाव यांना निवेदन देऊन कारवाई करण्याच्या सूचना देऊ.शेवगावचे जे प्रश्न आहे ना हे फक्त कागदावर आहे नगर परिषदेने पंचायत समिती शेजारी पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईन साठी जे खड्डे खणले होते तर शेवगाव करांना काही उपयोगही झाला नाही बिल कसे निघाले ??? रस्य्ताच वाटोळं झालं ते तर वेगळच बोगस बिल काढुन ढेकरही देवून झाला पण असो खंडोबा नगर आणि इतर उपनगरतले लोक या रस्त्याने गावामध्ये ये जा करतात तेथे खड्डे बुजवायची सुद्धा तसदी नगरपरिषदेने घेतली नाही नुसते पुढारी येतात उदघाटन करतात त्या गोष्टीच राजकारण करतात आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास भोगायला लागतो अमरधाम कडे जाताना त्या रस्त्यावर पथदिवे नाही बाजार भरण्यासाठी जागा नाही मोठ खेड म्हणून इतर लोक शेवगावकरांना हिणवत राहतात सध्या गावाला कोणी आई बाप नाही ह्या ग्रुप वर सर्व पुढारी आहेत कोणीतरी दाखल घ्या आणि शेवगाव साठी काय करणार हे ही सांगा शेवगाव करांना वेठीस कोणी धरले आहे मला दोन हाना पण गांव पुढारी म्हणा कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved