Breaking News

चिमूर शहरात रक्षाबंधनाचा भव्य कार्यक्रम आयोजित

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी शनिवारीला चिमूर नगरीत येणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये वेगवेगळे पात्र साकारलेली व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे चिमूर नगरीत आगमन.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मोठया संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून दिनांक २४ ऑगस्टला शनिवारी दुपारी १२:०० वाजता रक्षाबंधन कार्यक्रम स्थळ गदगाव रोड कडील चिमूर कॉटन इंडस्ट्रिज (कॉटन मिल ) च्या परिसरात घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमास महिलांच्या खास भेटीला मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, आमदार बंटी भांगडिया व इतर मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, प्रदेश चिटणीस ममता डुकरे, दुर्गा सातपुते आशा मेश्राम, गिता लिंगायत, वर्षा शेंडे, भारती गोडे, प्रतिभा गेजिक, वैशाली चन्ने, कल्याणी सातपुते, नसीमा शेख रत्नमाला मेश्राम, छाया कंचर्लावार अरुणा नन्नावरे यांनी चिमूर तालुक्यांतील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved