Breaking News

अडीअडचणीत धावून येणाऱ्या अब्दुल शेख यांना गावागावातून बहिणीकडून रक्षाबंधन

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-  नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस चे युवक नेते अब्दुल हफिज शेख यांना कुकाणा, तरवडी, नांदूर शिकारी, पाथरवाले, चिलेखनवाडी, अंतरवाली या सह अनेक गावातील बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन केले, अब्दुल शेख यांनी तालुक्यातील विविध समस्या सोडविल्या असून कुकाणा येथे कार्यालयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरून अनेक बहिणींना मदत केल्याने गावागावातून अब्दुल शेख यांना राख्या बांधण्यासाठी महिलानी अब्दुल शेख यांच्या कुकाणा येथील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

अनेकांचा आधार बनलेले शेख यांनी ही या निमित्ताने राख्या बांधण्यासाठी आलेल्या बहिणींचा यथोचित सन्मान केला व आपण या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू काहीही अडचण आली तरी या भावाला हक्काने काम सांगा असे आवाहन सुद्धा अब्दुल शेख यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.पाचशेहुन अधिक महिलांनी अब्दुल शेख यांना राख्या बांधून या पवित्र बांधणाने औक्षण केल्याने अब्दुल शेख सुद्धा भारावून गेले.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved