जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला सकाळी 10:00 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथे तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे.ही शेतकरी न्याय यात्रा आंबोली चौरस्ता या ठिकाणावरून भिसी शहरामध्ये पोहचणार असून त्या ठिकाणी थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून जांभुळघाटकडे रवाना होणार असून जांभूळघाट येथे पोहचून पोहचणार असून त्या ठिकाणी थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून तीच न्याय यात्रा नेरी शहराकडे रवाना होणार असून नेरी शहरामध्ये पोहचल्यावर त्या ठिकाणी थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून तीच शेतकरी न्याय यात्रा शेतकरी बंधू-भगिनी यांचेसोबत दुपारी 1:00 वाजता पंचायत समिती कार्यालय चिमूर येथे पोहचणार आहे.पंचायत समिती कार्यालयासमोरून चिमूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी यांचे समवेत तीच न्याय यात्रा बालाजी महाराज देवस्थान येथे पोहचणार असून त्या ठिकाणी बालाजी महाराज व ईतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून ही न्याय तहसील कार्यालय चिमूर येथे पोहचणार असून पुढील प्रमुख मागण्यांचे अनुषंगाने शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या : (1) अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रुपरे 50 हजार तात्काळ मदत करण्यात यावी.
(2) शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात यावी. (3)अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे.
(4)कृषी पंपांना रात्री मिळणारी वीज दिवस पाळी करून 24 तास पुरविण्यात यावी. (5)शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेली प्रोत्साहनपर राशीचे 50 हजार रुपये देऊन 2 लाखाचेवर जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे.
(6) घरगुती वीज वापरासाठी लावण्यात येणार स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये. (7) मोखाबर्डी उपसासिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. (8)रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे तात्काळ देण्यात यावे. (9) वन जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावे. (10) घरकुल योजनांचे पैसे जराही विलंब न करता लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावे.(11) अतिवृष्टीमुळे पडलेले घर व गुरांचे गोठे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी.(12. वाढविण्यात आलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी.(13) ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता मागेल त्या शेतकऱ्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत पुरविण्यात यावे.(14) वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही वन विभागाने त्वरित थांबवावी.
या मागण्यांचे अनुषंगाने शेतकरी न्याय यात्राचे आयोजन केलेले असून सदर कार्यक्रमाला नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा,अविनाश वारजूकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी. आमदार, अध्यक्ष खनिकर्म महामंडळ (राज्यमंत्री) दर्जा,सतिश वारजूकर, समन्वयक चिमूर विधानसभा काँग्रेस तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ,विजय पाटील गावंडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर,गजानन बुटके महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी,अविनाश अगडे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर,विवेक कापसे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर,शाईश वारजूकर महासचिव प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल मोर्चा संपन्न होणार असून शेतकऱ्यांचे न्याय, हक्कासाठी होणाऱ्या न्याय मोर्चात सर्व चिमूर तालुक्यातील शेतकरी बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान चिमूर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.