जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा )- पतंजलि योग समिती खोकरला च्या वतीने दैनंदिन योग वर्ग खोकरला येथे रक्षाबंधन व वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक मारोती पुडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप वालदे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता तथा योग शिक्षक विलास केजरकर, योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, योग शिक्षिका अंजली बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खोकरला पतंजलि योग समितीचे महत्त्व रक्षाबंधन व वृक्ष रक्षाबंधन दिवसाचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश घोडे व प्रास्ताविक योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सार्वे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शितल रामटेके, वर्षा वैरागडे, सुरेंद्र पांडे, रमेश बुरबादे, दामोधर बोदेले, प्रमिला बुरबादे, मिना चावरे, माधवी नंदनवार, गणेश उपासे, गीता आगासे, प्यारेलाल शहारे, राजकुमार वहाणे, छाया मेश्राम, नितीन कढव, महादेव खोकले, महादेव वंजारी, शालीनी बैस, मंदा चावरे, जयश्री दुधकवार, रजनी कुकडकर, कल्पना दमाहे, पंचकुला पटले, शोभा डुंभरे, गिता आगाशे, विद्या सार्वे, लक्ष्मीनारायण भिवगडे, वनिता अनकर, मिना रोखडे, रंगारी, शामराव गौरी, रामलाल शेंडे, केशव खोटेले, विजय मेश्राम, कृष्णा गुणेवार, महादेव चांदेवार, खेमचंद्र रोटके, श्रीकृष्ण जिभकाटे, बंडू बेहरे, प्रमिला बुरबादे, बाबुलाल दमाहे, श्रध्दा पांडे, तसेच पतंजली योग समिती खोकरलाच्या महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.