Breaking News

स्कुल ऑफ ब्रिलिएंट येथे सहयोग मल्टीस्टेट शाखे कडून करण्यात आले वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील स्कुल ऑफ ब्रिलिअन्ट राळेगाव येथे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे जीवन जगण्या करिता जसे मूलभूत गरजांची आवश्यकता असते त्याच प्रमाणे धकाधकीच्या जीवनात शुद्ध, स्वच्छ वातावरणा करिता वृक्षारोपण करने अति आवश्यक आहे आपण जर आतापासूनच वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांचे अस्तित्वच धोक्यात येईल.आपण जर प्रत्येकाने एक जरी झाड लावले तरी आपला निसर्ग हिरवागार होऊन जाईल, आपल्याला स्वछ हवा मिळेल व आपली पुढील पिढी अनेक समस्यापासून सुरक्षित राहील हा उदात्त हेतू घेऊन असाच उपक्रम सहयोग शाखा राळेगाव च्या वतीने राळेगाव येथील स्कुल ऑफ ब्रिलिएंट येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात शाळेचे शिक्षकवृंद सतीश काकडे, कुलदीप वाघमारे, मीनल मून, विद्यार्थीगन यासोबतच सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑफ सोसायटी राळेगाव शाखेचे अखिलेश पांढरीपांडे, आकांक्षा निकम, अतिश पेंदोर, सचिन कापडे, तेजस इजालकर, सायली कोल्हे, उमेश दुरबुडे, सरला वावधने, प्रगती कावळे, ज्योती जगधरे, सारिका परचाके, सुधाकर बोभाटे, गणेश तेलंगे आदीच्या उपस्थितित सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वृक्षरोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved