Breaking News

सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी केला उघड

चक्क एच.पी.गॅसच्या ट्रॅकर मधून सुरू होती चोरी

दोन आरोपींसह ६४ व्यावसायीक सिलिंडर व दोन वाहने जप्त

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ 

राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दहेगांव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी अखेर उघडकीस आणला आहे.चक्क एच.पी.गॅस कंपनीच्या ट्रॅंकर मधून व्यावसायीक सिलिंडर भरले जात होते.वडकी पोलीसांनी धाब्यावर अचानक धाड टाकून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन ६४ व्यवसायिक सिलेंडरे दोन वाहने व अन्य साहित्य जप्त केले.हि कारवाई २७ आॅगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान करण्यात आली.

वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहेगाव फाट्याजवळील विरतेजा या धाब्याचे मागे एच.पी.गॅस कंपनीच्या ट्रॅंकर मधून गॅसची चोरी करून सिलेंडर भरत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे धाब्यावर पोलीसांनी अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी काही जण एम.एच.४० बी.जी.५९७४ क्रमांकाच्या गॅस टँकर मधून टँकर कॅप्सुलचे वाॅल पैकी मधल्या वाॅल मधून पाच नोझल असलेल्या एका लोखंडी पाईपच्या सहायाने रिकामे व्यवसायिक सिलेंडर भरताना आढळून आले.

तसेच भरलेले सिलेंडर बाजूला उभी असलेल्या एम.एच.१२ जि.टी.१५८४ या क्रमांकाच्या वाहनामध्ये टाकतांना दिसुन आले.या प्रकरणी पोलिसांनी धाबा चालक श्रवण कुमार राजूराम (२८) ग्राम पल्ली जि.जोधपूर राजस्थान व शिवबहादुर सिंग रामलखन सिंग (४९) ग्राम नकटी पवैया जि.सतना मध्यप्रदेश यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून त्यांचे कडून एक टँकर, एक टाटा मोटर्स कंपनीचे ४०७, निळ्या रंगाची ३९ व्यवसायिक सिलेंडर,२५ खाली सिलेंडर, लोखंडी नोझल असलेलले प्लॅस्टिक पाईप,वजन काटे व एक लोखंडी पाना असा जवळपास ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,आकाश कुदूसे, विनोद नागरगोजे, सचिन नेवारे यांनी पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved