Breaking News

खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळांचा नियमित सराव करावे- प्राचार्य डॉ. विकास ढोमणे

जे. एम. पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा )- मेजर स्व. ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्यामुळे हॉकी खेळाला अत्यंत लोकप्रीय बनविले होते. आणि १९२८, १९३२, च्या कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. म्हणून त्यांना हॉकीचे जादूगर म्हणतात. व त्यांना मेजर पदवी मिळाली आणि त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या नावाने भारत सरकार द्वारा विविध खेळाडू, प्रशिक्षण यांना राष्ट्रीय खेल हा पुरस्कार दिल्या जातो. या संधीचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी घ्यावे. व आपल्या आई-वडिल व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे नाव अजरामर करावे. म्हणून खेळाडूंनी अभ्यासाबरोबर विविध खेळाचा नियमित सराव करावा असे मत जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी केले. ते जे. एम. पटेल महाविद्यालयात मेजर स्व. ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस व ग्रीन जीमचे उद्घाटन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, डॉ. श्रीधर शर्मा, डॉ. शाम डफरे उपस्थित होते. पुढे म्हणाले शारीरिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या ग्रीन जिमचा सर्वांनी लाभ घ्यावा. स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी ग्रीन जिम अत्यंत महत्त्वाची आहे. असे विचारले प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी फीत कापून उद्घाटन करतांना व्यक्त केले.

या दिनानिमित्य क्रिडा विभागाच्या वतीने दोन दिवशीय महाविद्यालयात आंतरवर्गीय स्पर्धेत रस्साखेच, फुटबॉल (पुरुष), लंगडी हॉकी (पेनौल्टी शुट) इत्यादी क्रिडा घेण्यात आल्या होत्या.त्याप्रसंगी सुहानी कंगाले, आकाश उके, दिक्षा पचारे, शितल नरबरिया, प्राची चटप, सिध्दी कावळे, कल्याणी करवाडे, मेघा उके, साक्षी साकुरे, अंजली बर्वे, शिल्पा तरारे, रिया गोटेफोडे, अंजली कुंभारे इत्यादींनी विविध खेळात राष्ट्रीय व आंतर विद्यापीठात पदक प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला डॉ. विणी ढोमणे, डॉ. उज्वला वंजारी, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. शिरीश नखाते, डॉ. विणा महाजन, डॉ. विजया कन्नाके, डॉ. शायनाप्रविण कुरेशी, डॉ. अमर नंदनवार, डॉ. प्रशांत वालदेव, डॉ. अमोल सातपुते, डॉ. प्रविण घोसेकर, डॉ. जयप्रकाश मतलाम, डॉ. पियुश संगतसाहेब, प्रा. जितेंद्र किरसान, प्रा. भोजराज श्रीरामे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोमी बिष्ट यांनी केले. व प्रास्तविक आणि उपस्थितांचे आभार क्रिडा विभाग प्रमुख डॉ. भिमराव पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे. एम. पटेल महाविद्यालयातील सर्व विभाग-प्रमुख, प्राध्यापक गण, शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved