जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्षेत्रातील मालमत्ता धारक यांना थकीत व चालू मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांनकरिता प्रोत्साहन बक्षिसे ईश्वर चिट्टी पद्धतीने सोडत कार्यक्रम सावित्रीबाई फुले सभागृहात मुख्याधिकारी डॉ सुप्रिया राठोड यांचे उपस्थित घेण्यात आला या कार्यक्रमात ईश्वर चिट्टी द्वारे 15 मालमत्ता धारकांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.सन 2023-24 या वर्षातील चालू मालमत्ता व पाणी कर तसेच थकीत मालमत्ता व पाणी कर भरणाऱ्या मालमत्ता धारकाकरीता नगर परिषद चिमूरच्या वतीने लकी ड्रॉ योजना काढण्यात आली होती यात 299 चालू व थकीत मालमत्ता धारकांनी कर भरून लकी ड्रॉ योजनेत नावाची नोंद करून सहभाग नोंदविला होता.
आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सावित्री बाई फुले सभागृहात मुख्याधिकारी डॉ सुप्रिया राठोड यांचे उपस्थित घेण्यात आलेल्या प्रोत्साहनपर बक्षीस ईश्वर चिट्टी पद्धतीने सोडत कार्यक्रमात. पार्वता वाघधरे यांना 32 इंची स्मार्ट टीव्ही. नंदकुमार बेत्तावार यांना कुलर. विनोद शिरपुरवार यांना गॅस शेगडी. वंदना ताजने यांना त्रव्हलिंग बॅग. सरस्वती वाकडे यांना टेबल फॅन. घनश्याम मेंधूलकर यांना सीलिंग फॅन. ज्योती दहीलकर यांना स्टडी टेबल. पांडुरंग वाकडे. इंदूबाई बनकर. सुंदरा रामटेके याना प्रेशर कुकर. सूरज जवळे याना इलेक्ट्रिक प्रेस. वर्षा शेडामे यांना इडली साचा. सुरेश जुमडे याना मिल्टन बॉटल. मंगला वेदी यांना टिफीन बॉक्स. व सदाशिव सावसाकडे याना कॉलेज बॅग बक्षीस वितरण करण्यात आले.
नियमित कर भरण्याचे आवाहन चिमूर नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड यांनी यावेळी नागरिकांना केले. यावेळी नगर परिषद अधिकारी हरीचंद्र डांगे. स्नेहल दाभेकर. हेमंत राहुलवार. सुधाकर उरकूडे. दिलीप ठांकरे. विनोद मेश्राम उपस्थित होते