मुस्लिम एकता तर्फे चिमूर शहरात जाहिर निषेध मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- आ. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत कारवाई करुन गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी चिमूर येथील मुस्लिम समाजातर्फे पोलीस उपविभागीय अधिकारी,अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 1 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात मुस्लिम समाजाचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनात नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत अपशब्द बोलून जीभ कापण्याची, तसेच मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली, कारण आ. नितेश राणे हे लोकसेवक असून त्यांनी आपल्या वक्तव्याद्वारे दंगा घडून आणण्याच्या उद्देशाने बेछूटपणे प्रक्षोभक भाषण केलेले आहे.
त्यामुळे धर्माच्या कारणावरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढले असून एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती केलेली आहे. सदरची कृती मशिदमध्ये म्हणजे उपासना स्थळी करण्याची धमकी दिलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे कृत्य केलेले आहे.लोकसेवक असून त्यांनी व्यक्ती व समाजाला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केलेली आहे व निर्देशाचा भंग केलेला आहे. एवढेच नव्हे तर मुस्लिम धर्माचा व धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी पुरस्सर व दुष्ट हेतूने कृती करून धार्मिक भावना दुखावलेले आहे. तसेच मशिदीत घुसून मारणार व जीभ कापणार असे बोलून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केलेला आहे.
त्यामुळे सार्वजनिक आगळकी होण्यास साधक अशी विधाने केलेली असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणीचे निवेदन देण्यात करण्यात आले. निवेदन देतेवेळी सुन्नी मस्जिदचे मौलाना तंजिल रजा, सदर हाजी कलीम पठाण,मौलाना मो.अन्सार खडसंगी, अझहर शेख सदर खडसंगी,जामा मस्जिदचे मौलाना अनिस, सेक्रेटरी आरिफ शेख,हापिज हाजी सिद्धिक सायानी, अफरोज पठाण, जावा शेख,पप्पू शेख,इकबाल सौदागर,इमरान कुरेशी, बब्बू खान,आरिफ बाबू, कलीम शेख आदि समाज बांधव व मुस्लिम महिलांचा ही मोठा सहभाग होता.