राजाराम लॉन येथे जाहीर व्याखाण्यात गरजले मानव
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
( भंडारा ) – भारत देशात व महाराष्ट्रात मनुवादी सरकार आले.तेव्हापासून राज्यातील अनेक औद्योगिक प्रकल्प स्थानांतरित केल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.तसेच महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे.अशा बाबींमुळे भारतीय लोकशाहीत खूप मोठं – मोठे आव्हान निर्माण झाले आहेत.संविधान बदलून मनुवाद भारतात आणन्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे हाणून पाडणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य , समता,बंधुता व सामाजिक न्याय हा विचार भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून रुजविला.हाच विचार आपल्या देशात रुजविण्यासाठी व भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याकरिता संविधान मानणाऱ्या विचार सरणीची माणसे सत्तेत आली पाहिजे.या दृष्टीकोनातून आपण पावले उचलली आहेत.त्या करिता मी राजकीय भूमिका घेतलेली आहे.या करिता “संविधान वाचवा,महाराष्ट्र वाचवा ” असे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राजकीय विश्लेषक प्रा.श्याम मानव यांनी केले. ते संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव “या विषयावर राजाराम लॉन तुमसर येथे त्यानीआपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी विशेष अतिथी, प्रसिध्द विचारवंत दशरथ मडावी म्हणाले की, राज्यघटनेची उद्धेशपत्रिकेत देशाचे मानव जातीच्या कल्याणाचा विचार आहे. पण वर्तमानात सरकारने महाराष्ट्रातील सर्व आय. टी.आय. च्या दर्शनी भागात “संविधान मंदिराचा” उदघाटन सोहळा पार पडला.संविधान मंदिर असा उल्लेख करणे म्हणजे मनुवादी विचार सरणी त्यात दिसून येते.हिंदू – मुस्लिम वाद निर्माण करून जातीय तेड वाढविण्याचे काम सरकार करीत आहे,तेव्हा आपण सावध असणे गरजेचेअसल्याचे प्रतिपादन केले.
महामानवाना अभिवादन करून मॉ साहेब जिजाऊ वंदनेने सौ.शीतल अनिल भुसारी यांनी कार्यक्रमाला सुरवात केली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य वाय.एस.देशभ्रतार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री ठाकचंद मुंगुसमारे सामाजिक कार्यकर्ता, श्री,सुरेश झुरमुरे अ.भा.अनिस कार्याध्यक्ष,श्याम कोसरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड भंडारा, ऍड.दिलीप तीमांडे,विजय गिरीपुंजे माजी नगरसेवक,राजकुमार चामट मार्गदर्शक मराठा सेवा संघ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश झुरमुरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी केले.सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाधक्ष्य ऍड.राकेश शिंदेगनसुर यांनी केले तर आभार प्राचार्य राहुल डोंगरे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक यानी केले.कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी लॉ .मनोज उकरे,किशोर बोंद्रे,विजय केवट,अनिल भुसारी,नाना ठवकर,संजय बडवाईक,किशोर माटे,राजेश कांबळे,चंद्रकांत लांजेवार,संजय सार्वे,चिंतामण वैद्य, जयशंकर मने, प्रा. रेनुकादास उबाळे, इंजि. अल्पेश घडले,प्रकाश चव्हाण सह संभाजी ब्रिगेड,श्री महाकाल बहुउद्देशीय संस्था,जिजाऊ ब्रिगेड,छञपती फाउंडेशन,डॉ, बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती,गोंडवाना संघर्ष कृती समिती,अखील भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.