” आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न “
” जय श्रीराम बाल गणेश मंडळचा अनोखा उपक्रम “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नुकतेच पहिल्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असून आता मस्कऱ्या गणपतीच्या स्थापनेला सुरुवात झाली असून जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील गणेश मंडळाच्या वतीने अंध. अपंग. व मुक बधीर विद्यार्थ्यांचे हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. टिळक वॉर्ड चिमूर येथील जय श्रीराम बाल गणेश मंडळ नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात व अग्रेसर असते.
वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांचे विचार या मंडळाच्या पदाधीकऱ्यानी अंगीकरल्याने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गणेश मूर्तीची स्थापना असल्याने गणेश मूर्ती बंडी बैल सज्ऊन अगदी साध्या पद्धतीने मूर्ती मंडपात आणण्यात आली. मूर्तीची विधिवत पूजा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. आरती नंतर विद्यार्थ्यांना भोजन दान करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी. सहित सर्व कर्मचारी व जय श्री राम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न
चिमूर शहरातील चिमूरचां राजा जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती टिळक वॉर्डच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जय श्रीराम बाल गणेश उत्सव समिती टिळक वॉर्ड चिमूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी मस्करया गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविल्या जातात.नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी ओळख या गणेश मूर्तीची आहे. यावर्षी सुधा आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शंभर पेक्षा जास्त रुग्णांनी तपासणी करून घेतली.
सोबत मोफत औषधी वाटप करण्यात आली. रक्तदान शिबिरात 50 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान दान केले.रक्तदात्याना व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके यांचे उपस्थित प्रमाण पत्र व छत्री वाटप करण्यात आली. या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून चिमूरचां राजा जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूरचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.