अध्यक्षपदी अनिल तवाडे तर उपाध्यक्षपदी सोनूताई धारगावे यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674
(भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्राअंतर्गत येत असलेल्या केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे(26 सप्टेंबर )ला शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा वंदना माटे याचे अध्यक्षतेखाली आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे यांचे उपस्थितिमध्ये पालक सभा घेण्यात आली.पालक सभेला उपस्थित पालकांमधून 5 महिला सदस्या आणि 4 पुरुष सदस्यांची निवड करून शैक्षणिक वर्ष 2024-2026 करिता शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल तवाडे तर उपाध्यक्षा म्हणून सोनूताई धारगावे यांची निवड करण्यात आली.समितीमध्ये सदस्य म्हणून अमोल चिरवतकर,गणेश चंदनबावणे, पत्रकार जयेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली.तर वामिना फुंडे, दिपाली बागडे,वंदना माटे,नंदाताई चंदनबावणे यांची सदस्या म्हणून निवड करण्यात आली.
नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्यगण यांचे मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे आणि सहाय्यक शिक्षक डी. आर.पानसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक डी.आर.पानसे यांनी मानले.