२५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास एसडीई उपगलनवार तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
२५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन
चिमूर नगरीत आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात २५ कोटी ४६ लक्ष रू कामा चे भूमीपूजन संपन्न झाले. तहसील कार्यालय येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंचावर प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे,सहाय्यक जिल्हा निबंधक अंकिता तांदळे तहसीलदार राजमाने,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ.मायाताई नन्नावरे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे,उपस्थित होते.
दुय्यम निबंधक श्रेणी-१ प्रशासकीय इमारत, चिमुर या कायालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे,ता.चिमूर जि. चंद्रपूर २१४.२६, चिमूर येथील तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे. ३५०,००, चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे. १४३१.६३,चिमूर येथे २९ तलाठी कार्यालय बांधकाम करणे. ४३५,००, असे एकूण 27 कोटी 53 लक्ष रुपये किमतीचे भूमिपूजन आमदार बंटी भांगडिया यांचे हस्ते पार पडले.
आमदार बंटी भांगडिया यांचे विदर्भ पटवारी संघाचे वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज ची मूर्ती भेट सन्मानित करण्यात आले. संचालन एकनाथ थुटे यांनी केले.तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपविभागीय अधिकारी उपगलनवार,भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर, शेयस लाखे, अमित जुमडे, नरेंद्र हजारे शैलेश पाटील,संदीप पिसे,विनोद चोखरे,योगेश नाकाडे, अर्जुन पाटील थुटे,करण चावरे,राजु बोडणे उपस्थित होते.