घाणीचे साम्राज्य ठरत आहे कित्येकांच्या आजाराचे कारण
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव ग्रामस्थांच्या आरोग्याशी जणू खेळ सुरु आहे.एकीकडे स्वच्छ भारत स्वच्छ गाव स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते.गाव आणी शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे मात्र राळेगाव तालुक्यातील पेसा अंतर्गत येत असलेल विहिरगाव गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छ ते कडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आला आहे गावात डेंगू आजार बळावले आहे.गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबल्याने परिसरातील रस्तावरून दुर्गंधी युक्त घाण पाणी ओसांडून वाहत आहे या कडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावात स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा झाले आहे,गावात अनेक ठिकाणी व रोडच्या कडे ला लागून असलेल्या नाल्या अनेक दिवसा पासून तुंबल्या आहे.
या नालीच्या घाण पाण्याची भर पडली आहे त्यामुळे इतरांना स्वछतेचे शहाण पण शिकवणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा दिव्या खाली अंधार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे,गावातील मुख्य रस्त्यांवरच नालीचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने दुर्गंधी मुळे लहान मुले वय वृद्ध व नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील सरपंच उपसरपंच या विभागात थिरकत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे त्यामुळे येथे युद्ध पातळीवर कार्य करून उपाय योजना कराव्या अशी मागणी समस्त गावकरी करीत आहे.घरा घरात मोठया प्रमाणात कचरा जमा होत असतो कचरा गोळा करण्यासाठी कोणतीही उपाय योजना ग्राम प्रशासनाने केलेली नाही त्यामुळे प्रत्येक घरात डासाचे प्रमाण वाढले असून आजार ही मोठ्या प्रमाणात फोफावले आहे,सचिव सरपंच यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तो कचरा तसाच घरात पडून असतो सदर कचरा टाकावा कुठे हा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.