बहुजन समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी जनजागृती
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- 29 सप्टेंबर 2024 रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित भव्य बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधानाच्या रक्षणासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली.रॅलीची सुरुवात सकाळी 8:00 वाजता साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपासून झाली. मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते.रॅली साकोली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून बांपेवाड्यापर्यंत पोहोचली. रॅलीच्या दरम्यान, कार्यकर्त्यांनी बहुजन समाजाच्या हक्कांबद्दल जनजागृती केली. विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सदर रॅलीचा समारोप बुद्ध विहार समिती, एकोडी येथे झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक समानतेसाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.रॅलीच्या समारोपानंतर बहुजन समाज पक्षाच्या विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाचे महत्त्व आणि बहुजन समाजाच्या हक्कांबाबत भाषणे केली. या रॅलीमुळे समाजातील विविध घटकांमध्ये संविधानाच्या रक्षणाबाबत जागृती निर्माण झाली.या वेळी अमित रामटेके जिल्हा महासचिव, बसपा स्वप्नील गजभिये जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष, बसपा मनोज कोटांगले प्रभारी, साकोली विधानसभा, बसपा,रोशन फुले प्रभारी, साकोली विधानसभा, बसपा कार्तिक मेश्राम अध्यक्ष, साकोली विधानसभा, बसपा,चंद्रहास चव्हाण महासचिव, साकोली विधानसभा, बसपा यांनी रॅलीस मार्गदर्शन केले.
या यशस्वी रॅलीमुळे बहुजन समाजातील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संविधान रक्षणासाठी व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी कार्यकर्ते अधिक दृढनिश्चयी झाले आहेत.
या संविधान जनजागृती बाईक रॅली ला यशस्वी करण्यासाठी
जिला व सर्व विधानसभा, बूथ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.