Breaking News

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथे ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

 

चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच, आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात झालेला संपूर्ण चिमूर विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व समाजकार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले.

“आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांचा चिमूर तालुक्यातील मालेवाडा, जांभूळघाट, पारडपार, पूयारदंड, गडपिपरी व आंबोली येथे गाव भेट तथा संवाद दौरा कार्यक्रम”

भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व सांसदीय अनुसुचित जमाती मंडळाचे अध्यक्ष खा. फग्गन सिंहजी कुलस्ते व आमदार किर्तीकुमार , बंटी भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत आंबोली पंचायत समिती क्षेत्रातील मालेवाडा, जांभूळघाट, पारडपार, पूयारदंड, गडपिपरी व आंबोली या गावांमध्ये विविध ठिकाणी भेट दिली व कॉर्नरसभेत स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. या गाव भेट तथा संवाद दौऱ्याप्रसंगी विविध मंदिर देवस्थान व नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देऊन देवींचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी समस्त ग्रामवासीयांच्या वतीने भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व सांसदीय अनुसुचित जमाती मंडळाचे अध्यक्ष खा. फग्गन सिंहजी कुलस्ते व आमदार बंटी भांगडीया यांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा …

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved