जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्य पदी एकनाथ थुटे यांची शासन आदेश क्र. अशास १०२४/प्रक १०९/ एसडी २ दिनांक १५ ऑक्टोबर २४ च्या शासन निर्णयाने निवड झाली. एकनाथ थुटे हे श्री गजानन विद्यालय आंबेनेरी येथे शिक्षक असून भाजप मध्ये विविध पदावर कार्यरत आहे. आमदार बंटीभाऊ भांगडिया, शिक्षण मंत्री दिपक केसरकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारस नुसार नियुक्ती करण्यात आली.एकनाथ थुटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल चिमूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.