अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडुकीचे बिगुल वाजले शेवगाव तहसीलमधून राबविणार निवडणूक प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी तयारीबाबत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी येथील शेवगांव तहसील कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. मतदारसंघात लोकसभा निवडणुकी च्या तुलनेत विधानसभेला ११ हजार २८२ मतदारांची वाढ झाली असून, प्रशासनाने नव्याने तीन मतदान केंद्रांची निर्मिती केली असल्याचे मते यांनी सांगितले.
यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगांव तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले आदी उपस्थित होते. प्रसाद मते यांनी सांगितले की, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील ८ महसूल मंडळ, ११३ महसुली गावे तसेच पाथर्डी तालुक्यात ६ महसूल मंडळ, १०१ महसुली गावांचा समावेश असून, निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे शेवगाव तहसील कार्यालयामधून राबवण्यात येणार आहे. एकूण मतदार पुढील प्रमाणे (१) स्त्री मतदार १,७८,५९४ (२) तृतीयपंथी मतदार 06 (३) युवक मतदार ८१८३ (४) पुरुष मतदार १,९३,८७६१ (५) दिव्यांग मतदार २४६४ (६) सेवादलात कार्यरत मतदार १०२ एकूण मतदार ३,७२,४७६ होणार आहे. लोकसभेवेळी ३६५ मतदान केंद्र होती. परंतु, एका मतदान केंद्रामध्ये १ हजार ५०० मतदारांचा निष्कर्ष ठेवता विधानसभेसाठी नव्याने ३ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ३५ क्षेत्रीय अधिकारी, ४७२ मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून,
त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ईव्हीएम ठेवण्यासाठी व सुरक्षेसाठी शेवगाव तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र शेवगाव तहसीलदार कार्यालय येथे दि. २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत शासकीय सुटीचा दिवस वगळता स्वीकारण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असून, प्रचार सभा, परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच प्रथम येणाच्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल व त्यानुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे मते यांनी सांगितले.या ठिकाणी वाढले मतदान केंद्र शेवगाव शहरात मतदान केंद्र क्र. ७६ व ९१ असे दोन तर पाथर्डी शहरात मतदान केंद्र क्र.२४६ असे एकूण तीन मतदान केंद्रांची निर्मिती नव्याने करण्यात आली आहे.हजार चे पालन होण्याच्या दृष्टीने सहा पथके कार्यान्वित करण्यात आली आहे.शेवगाव तालुक्यातील कऱ्हेटाकळी तर पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी व चीतळवाडी येथे स्थिर पथक नेमण्यात आले आहे. तब्बल ५०० हून अधिक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*