मुलीच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू दोघांना अटक पाच फरार : शेवगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव:- या बाबत सविस्तर वृत्त असे की मुलीशीशेवगांव बसस्थानकावर बोलणाऱ्या युवकांसह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १४ रोजी घडली आहे. तालुक्यातील ठाकूर निमगांव येथे तीन युवकांना बुधवार दि.९ रोजी मारहाण करण्यात आली होती.मारहाण झालेल्या एका युवकाने दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. १० रोजी शेवगांव पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेतील गंभीर जखमी प्रमोद उर्फ बंटी राजेंद्र चव्हाण याचा, अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटने प्रकरणी शेवगांव पोलिस स्टेशन ला मयूर कैलास रोठे याने फिर्याद दाखल केली. फिर्यादी व त्याचे मित्र 1) प्रमोद राजेंद्र चव्हाण, 2) सार्थक अशोक काकडे हे तिघे जण मोटारसायकल वरून शेवगांव बस स्थानकां मध्ये गेले होते. यावेळी मयत प्रमोद चव्हाण हा एस.टी. बस मध्ये बसलेल्या त्याच्या मामाच्या मुलीशी बोलत होता.
त्यावेळी गावातील बारक्या पठाण याने मोबाईल मध्ये शूटिंग घेऊन, गावातील भारत आसाराम कातकडे यांना पाठवली. त्यानंतर तिघे मित्र ठाकुर निमगांव येथे गांवी येऊन जिल्हापरिषद मराठी शाळेत ओट्यावर बसले असताना भारत आसाराम कातकडे, बारक्या पठाण आणि त्यांचे ईतर सहकारी तेथे आलें भारत याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने प्रमोद चव्हाण यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
प्रमोद यास सोडवण्यासाठी फिर्यादी व सार्थक काकडे गेले असता, अशोक निजवे, बारक्या पठाण यांनी तिघांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व भारत कातकडे यांच्या घराकडे घेऊन जाऊन तिघांना सुताच्या दोरीने बांधून ठेवले. यावेळी भारत कातकडे, शारदा भारत कातकडे अशोक निजवे, बारक्या पठाण यांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटल्या प्रमाणे गावातील एका इसमाने पोलिसांना फोन करुन कळविले असता पोलीस तिथे आले दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील जखमी प्रमोद चव्हाण याचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याच्यावर सायंकाळी उशिरा त्याच्या गावी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. पुढील तपास शेवगांव पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगांव पोलिस करत आहेत.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*