जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
( भंडारा ) – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष,जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा अंतर्गत आय.सी.टी. सी.विभाग ग्रामीण रुग्णालय पवनी द्वारा आयोजित एच.आय व्ही./ एड्स नियंत्रण,मार्गदर्शन संवेदीकरण आणि जनजागृती शिबीर कार्यक्रम ( ता.11) ला पवनी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय केसलवाडा येथे घेण्यात आला.
एच.आय व्ही./एड्स नियंत्रण,मार्गदर्शन संवेदिकरण आणि जनजागृती शिबीर कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय पवनी यर्थील आय. सी.टी.सी विभागाच्या समुपदेशक कु.माधुरी रामटेके,ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथील एन.सी.डी.विभागाचे विभागाचे समुपदेशक गुरूनंद जाधव,सरपंच धनराज वलके,ग्राम पंचायत सदस्य नंदेश्वर फुंडे, तेलपेंढरी येथील पोलीस पाटील सुबोध बारसागडे.आशा वर्कर पौर्णिमा बारसागडे,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
एच.अस्य व्ही./ एड्स नियंत्रण,मार्गदर्शन संवेदीकरण आणि जनजागृती शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी,लोकप्रतिनिधी,गावकरी नागरिक,आंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचेकरिता करण्यात आले होते.शिबिरामध्ये 30 ते 40 महिला आणि पुरुषांची तपासनी करणात आली आणि मार्गदर्शन करण्यात आले.