बोधेगाव येथील घटना : ६५ हजारांचा ऐवज लंपास, गहू- ज्वारी चोरली
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव :– या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह घरातील गहू, ज्वारी आदी धान्य लंपास केले आहे. सदरील घटना बुधवारी (दि. १६) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.अतुल अरुण घोडके (वय ३९) यांचे बोधेगाव येथील घोरतळे गल्लीत घर आहे. ते सध्या कामानिमित्त भडंगपेट जि. हैदराबाद (तेलंगणा) याठिकाणी वास्तव्यास आहेत. बोधेगाव येथील घरी त्यांची आई राहते. परंतु मागील महिन्यात अतुल घोडके यांचा मुलगा आजारी असल्याने त्यांची आई मागील महिन्यात मुलाकडे गेलेल्या होत्या. तेव्हापासून घर बंदच होते.
याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी बोधेगाव येथील अतुल घोडके यांचे घर फोडून चोरट्यांनी सामानाची केली उचकापाचक.कपाट व इतर सामानाची उचकापाचक केली.कपाटातील पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम ३२ हजार रुपये, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ११ भार चांदीचे दागिने आणि घरात असलेली ५० किलो वजनाची गव्हाची एक गोणी व २५ किलो ज्वारी, असे मिळून अंदाजे ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला बुधवारी (दि. १६) सकाळी अतुल घोडके यांचे चुलत भाऊ ओंकार घोडके यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याक्षणी त्यांनी फोनवरून अतुल घोडकेंना घटनेची माहिती दिली. त्याचवेळी ते कामानिमित्त पुण्यात आलेले होते. बुधवारी सायंकाळी अतुल घोडके पुण्याहून बोधेगाव येथे आलें आले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले.त्यावेळी त्यांनी फोनवरून आईला घटनेची माहिती देऊन घरातील चोरी गेलेल्या ऐवजाची खातरजमा केली. त्यानंतर गुरुवारी (दि. १७) याप्रकरणी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली.
*ताजा कलम*
*गेल्या काही महिन्यां पासून बोधेगांव लाडजळगाव बालमटाकळी या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे या भागतेक स्वतंत्र पोलिसटेशन असणे गरजेचे आहे बऱ्याच दिवसांपासून तशी या भागातील लोकांची मागणी आहे त्यात चोरी झालेले ठिकाण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून,आजू बाजूला घरे आहेत. तरीदेखील चोरट्यांनी मध्यवस्तीत घुसून बंद घर फोडण्याचे धाडस केले. त्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे घटनेचा पुढील तपास शेवगांव पोलिस स्टेशनचे पी. आय. समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस नाईक ईश्वर गर्जे हे पुढील तपास करत आहेत आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना आढळल्यास जवळच्या पोलिस स्टेशन ला कळवण्याचे आवाहन शेवगांव पोलिसांनी केले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*