विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- श्री संत रविदास महाराज युवा मित्र परीवार कडून नागपूर शहरातील संत रविदास सांस्कृतिक सभागृह येते चर्मकार समाजाचा भव्य वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गड़करी, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने,हितेश मुंदाफळे मंचावर उपस्थित होते. गडकरी यांनी दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाला सुरवात केली.चर्मकार समाजातील युवक युवतींना पुढील जीवनाकरिता आशीर्वाद देत संबोधित केले.
कार्यक्रमाची सांगता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्मकार समाजातील युवक युवतींना आशीर्वाद देऊन केली. यावेळी प्रामुख्याने आयोजक – प्रेम(हितेश)युवराज मुंदाफळे,संदीप वासनकर,नरेन्द्र मालखेडे,पवन मालखेडे, स्नेहल वासनकर,प्रिया मुंदाफळे,अश्विनी मालखेडे,रूपाली मालखेडे,अनिकेत आग्रे सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.