Breaking News

पांढरकवडा पोलिसांची कारवाई कतलीसाठी जाणा-या ५६ गोवंशाची सुटका

गोवंश तस्करीचा ट्रक सोडून चालक पसार

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ :- नागुपर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्रबाद येथे कतलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवडा या गावाजतवळ सापळा रचला होता. पोलिसांनी गोवंश घेवून जाणा-या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. यावेळी ट्रक थांबवून चालक व त्याच्या दोन साथीदार शेतातून पसार झाले. पोलिसांनी ५६ गोवंशाची सुटका केली असून, ट्रकसह ४३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला २१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते.उ

अशातच काही इसम नागपूर ते पांढरकवडा येणा-या राष्ट्रीय महामार्गावरुन हैद्रबाद येथे एका ट्रकमधून गोवंशीय जनांवरांची कत्तली करीता तस्करी करनार असून, ट्रकचे काच फुटल्याची माहीती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी वाराकवठा गावाजवळ हायवे रोडवर सापळा रचला. एम. एच.२९ बि.ई. ४३४ क्रमांकाच्या ट्रक चालकाला वाहन थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रक चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक रोडवरतीच थांबवुन ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार खाली उतरून शेतामध्ये पळुन गेले.पो.स्टाफने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही.पोलिसांनी ५६ गोवशीय बैल जातीचे जनावराची सुटका करुन रासा येथील गोरक्षण संस्थेत जमा करण्यात आले.पोलीस स्टेशन पांढरकवडा ह‌द्दीतील वारा गावाजवळ हैद्राबाद कडे कतली करीता जाणारे एकूण ५६ गोवंशीय गोरे व बैल किंमत १३ लाख ६० हजार रुपये व एक ट्रक किंमत ३० लाख रुपये असा एकूण ४३ लाख ६० हजार रुपयाचा मु‌द्देमाल जप्त केला.

तिन्ही आरोपीता विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११: (१) (घ) (ङ) (च) (ज) (ट) (८) (झ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ कलम ५ (अ), (१). व५ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर कार्यवाही डॉ.कुमार चिंता पोलीस अधीक्षक,पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक,रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा,सतीश चावरे,
पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा,यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पी एस आय धनराज हाके,उल्हास कुरकुटे, निलेश निमकर व पांढरकवडा पोलिसांनी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved