जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात सध्या रेती तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिमूर पोलीस अत्यंत सक्रिय झाले असून दिनांक. २२/०१/२०२५ ला रात्री १०:३० ते ११ वाजताच्या सुमारास गस्तीच्या वेळेस रेती माफियांवर पाळत ठेऊन हरणी खुटाळा मार्गाने पाठलाग करून चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडून चिमूर पोलीस स्टेशन ला जप्त करण्यात आले हि कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल व त्यांच्या पोलीस पथकाने केली.
असून सर्व ट्रॅक्टर मध्ये फावडे कुंडे असल्याचेही निदर्शनास आले. चारही ट्रॅक्टर मुंडा व ट्रॉली यांना नंबर नसल्याचे आढळुन आले.ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्करीत महसूल विभाग व पोलीसांना नेहमीच चकमा देत असते. भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अनेक मजुरांनी जिव सुद्धा गमविला आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन हि कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय चौधरी करीत आहे.