विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या शनिवार २५ जानेवारीला जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दुपारी १२ वाजता गादा रोड अजनी येथील विश्वरंजन सभागृहात, त्यानंतर दुपारी १.३० वाजता गुमथळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात, तर दुपारी ३ वाजता वडोदा ग्रामपंचायत जवळ, शिवाजी चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे नागरिकांशी सवांद साधणार असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्याचे सविस्तर माहिती असलेले लेखी निवेदन सोबत आणावे. निवेदन एकच विषयाचे असावे. सोबतच निवेदन कोणत्या विभागाशी संबंधित आहे त्याचा उल्लेख करावा असे कळविण्यात आले आहे. या जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.