तहसीलदार तथा पटवारी यांनी केला पंचनामा – चिमूर तहसील ला ट्रॅक्टर जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक २४/०१/२०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना खुटाळा येथील गावकऱ्यांनी ट्रॅक्टर पकडून तलाठी उमरे व तहसीलदार राजमाने यांच्या ताब्यात दिले असून सदर ट्रॅक्टर मालक मनोज नागपुरे यांच्या मालकीचे असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर चालक विक्की दिनकर नन्नावरे असल्याचे सांगण्यात आले.
ट्रॅक्टर हे स्वराज कंपनी 735 FEe या कंपनी चे आहे.ट्रॉली तथा मुंड्याला नंबर नसल्याचे आढळून आले.तसेच या ट्रॉली मध्ये एक ब्रास रेती सुद्धा भरून होती. या ट्रॅक्टर ला खुटाळा वासीय गावकऱ्यांनी पकडला असता गावकरी आणि ट्रॅक्टर मालकामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी सुद्धा जमली होती. यावरून आज वेगळेच बघावयास मिळाले महसूल अधिकारी कारवाई न करता जनताच या रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी सक्रिय झाल्याचे दृश्य बघावयास मिळाले असून याबाबतची चर्चा सर्वत्र तालुक्यात रंगली आहे.