जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव:- बोरगांव (कडू) येथील अतिक्रमण असलेली जागा भोगवट वर्ग २ मध्ये असल्यामुळे बोरगांव येथील त्या अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना शासनाच्या कुठल्याच योजनाचा लाभ घेता येत नाही आहे.बोरगांव मधील अतिक्रमनाचे एकूण ३ प्रकरणे आहे ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील ६ महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु याकडे शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे हे प्रकरण मार्गी लागायला विलंब होत आहे. यामुळेच घरकुल सारख्या शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ घेता येत नाही.
१५०० लोकसंख्या असलेल्या गावात फक्त १५-२० च लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरत असल्यामुळे लवकरात लवकर या जागेचे भोगवट वर्ग २ मधून १ मध्ये वर्गीकृत करून घरकुल सारख्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ मिळवून द्यावा.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मा. आमदार साहेब राजुभाऊ तोडसाम यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना मनसे तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे , दिलीप टेकाम,अरविंद झाडे,संभाजी तोडसाम,अभि बेले,प्रफुल नान्ने,दर्शन धानोरकर,गजू कोरडवार,प्रफुल शिवरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
*बोरगांव हा गाव विकासापासून एक दशक मागे राहिला आहे. मागील काही वर्षात गावातील अंतर्गत राजकारणामुळे गाव विकासापासून वंचित आहे. गावाचा विकास करण्यासाठी मा.आमदार साहेब राजुभाऊ तोडसाम लक्ष देतील अशी आशा आम्हा महाराष्ट्र सैनिकांना व गावकऱ्यांना आहे*
अश्विन ठाकरे-ता.उपाध्यक्ष मनसे.