जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- प.स.राळेगाव अंतर्गत वाढोणा (बा) उपकेंद्र विहिरगाव येथे दी.24/01/2025 रोजी उपकेंद्र विहिरगाव येथे एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प पांढरकवडा जिल्हा यवतमाळ अंतर्गत आदिम जमातीचे सरक्षण तथा विकास कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा करिता गावातील सरपंच चरणदास मेश्राम हे उपस्तित होते.
तर बालरोगतज्ञ डॉ.सिडाम , स्त्रिरोग तज्ञ डॉ.मडावी ,जनरल फिजिसियन डॉ.इंगोले ,तालुका आबालरोगतज्ञरोग्य अधिकारी डॉ.कपिल गोटे ,मोबाईल टीम अंतर्गत येणारे डॉ.शेख ,व त्यांचे कर्मचारी प्रा.आ.केंद्र वाढोणा (बा) येथील वैधकीय अधिकारी डॉ.उज्वला बरबटकर म्यॅडम उपकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी व प्रा.आ.केंद्रातील कर्मचारी हे सर्व उपस्तित होते शिबिरा दरम्यान गावातील मोठ्या संख्येने लोकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले त्या वेळी गावातील मोट्या संख्येने नागरिकाची उपस्तित होती.