विशेष प्रतिनिधी
शिंदखेड :- खडकपूर्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यां वरील लघुप्रकल्प हे संत चोखामेळा सागरातील अतिरिक्त पाण्याने भरण्यात यावे या मागणीसाठी कैलाश अर्जुनराव नागरे व हन्नान रसुल शेख अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिलेला आहे, परिसरातील इतर शेतकरीही त्यांना साखळी उपोषणासह देणार आहेत.खडकपुर्णा नदीला मिळण्या-या नद्यांवर असलेले लघुप्रकल्प मलकापूर पांग्रा, केशव शिवणी, असोला, गुंजाळा, अंढेरा, मेंडगाव, शिवणी आरमाळ हे किंवा आदी लघुप्रकल्प यामध्ये खडकपुर्णा नदीवर बनलेल्या संतचोखामेळा सागराचे शिल्लकचे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी किंवा आरक्षण उर्वरीत शिल्लक पाणी डाव्या कालव्याद्वारे किंवा नदीजोड प्रकल्प पूर्ण करुण किंवा अरबी समुद्राचे खारे पाणी गोड करुण किंवा टँकरद्वारे अशा कोणत्याही पद्धतीने पाणी सोडून परीसरात उगम पावणा-या नद्यांवरील बनलेले लघुप्रकल्प तुडुंब भरण्यात यावे,
व या नद्या जलमय करण्यात याव्या. एका शेतकरी हिताच्या निर्णयाच्या आदेशामुळे या लघुप्रकल्पावर किंवा नद्यावर अवलंबुन असलेल्या बहुसंख्य गावांचा आणि हजारो हेक्टर परिसराचा अमुलाग्र बदल घडत पिण्याच्या पाण्याचा समस्येसह शेतीत हरितक्रांती नक्कीच येईल. आणि या सारख्या इतरही आमच्या निवेदनात दिलेल्या लघुप्रकल्पाच्या संबंधीत तिन मागण्या तात्काळ पूर्ण करत यावर अमलबजावणी त्वरीत करण्यात यावी. अशी मागणी यापूर्वी दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.
मागण्या पूर्ण न झाल्यास कैलाश अर्जुनराव नागरे यांनी शिवनी आरमाळ लघुप्रकल्प तर हन्नान रसुल शेख यांनी केशव शिवनी लघुप्रकल्प यामध्ये परिसरातील इतर शेतकऱ्यांसह अन्नत्याग पोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रशासनाकडून त्यांच्या मागण्याची योग्य ती दखल न घेता मागण्या पूर्ण झाल्यामुळे वरील शेतकरी उपोषणास बसणार आहेत.