अविनाश देशमुख 9960051755
शेवगाव :- या बाबत सिवस्तर वृत्त असे की बऱ्याच टेंडर टेंडर प्रकियेनंतर आणि काथ्याकूट केल्यानंतर शेवगांव शहराच्या नगरोत्थान पेयजल योजने अंतर्गत सुमारे 75 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर कामाला सुरवात झाली परंतु शहरातील लक्ष्मीनगर भागातील लाखो लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामास सुरवात झाली त्याची पायाची खोली मंजूर प्लॅन नुसार 71 फूट उंची असल्याने अडीच मीटर जमीच्याखाली फुटिंग करणे मंजूर असताना कमी खोलीच्या पायातच मापात पाप करून थातुर मातुर काम सुरु असल्याचे सुजाण नागरिकांच्या निदर्शनास आले त्याची तक्रार घेऊन नेमके कोणाला भेटायचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे या बाबत पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता माझ्याकडे कपाटाची चावी नाही मला कंपनीचा संपर्क नंबर माहित नाही कंपनीचे कार्यलय शहरात कुठे आहे याचा पत्ता याच लोकांना माहित नाही.
*ताजा कलम*
कंपनीच्या प्रशाकीय कार्यालयाचा पत्ता नगरपरिषदेने नागरिकांना देणे गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही कोल्हापूरच्या स्वस्तिक इंडिस्ट्रीज ने काही स्थानिक लोकांची भरती केल्याने ते स्वतःलाच कंपनीचे मालक समजु लागले आहेत आमच्या कंपनीचे मालक केंद्रातल्या एका वजनदार मंत्र्यांचे पाहुणे आहेत तुम्ही आमचं काही वाकड करू शकणार नाही अशी भाषा बोलताना लोकांचे अनुभव आहेत आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार *”पहिला ठेकेदार चोर होता म्हणुन आता शेवगावकरांच्या बोकांडी हा दरोडेखोर तर नाही ना” ???*
*{ क्रमशः}*
*खंडोबा मैदानावर पडलेल्या शहरांतर्गत 4 इंची पाइपलाइनचे बंडल कमी गेज जाडीचे चे आणि दुमडलेल्या अवस्थेत आहेत जमिनीत गाडायच्या आधीच नि अवस्था तर वर्षानुवर्षे यिकणार कशी ???*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*