Breaking News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई द्वारा कुशल संघटक व उत्कृष्ट पत्रकार म्हणून प्रदीप रामटेके यांचा सन्मान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई हा सर्वात मोठा पत्रकार संघ असून महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघाचे ५० हजार पदाधिकारी व सदस्य आहेत.भद्रावती,चंद्रपूर,विदर्भातील पदाधिकाऱ्यांद्वारे भद्रावती येथे,”महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रजत मोहोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळावा ३ फेब्रुवारीला,”स्वागत सेलिब्रेशन हाॅल,येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाप्रसंगी दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे,”विदर्भ कुशल संघटक व उत्कृष्ट पत्रकार म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष निलेश सोमाणी,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पाणसे,महा.प्रांतिक तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय देवतळे,दैनिक महासागरचे जिल्हा संपादक प्रविण बदकी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष अनुपकुमार भार्गव,मानवाधिकार साहाय्यता संस्थानचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख विनायक गरमडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन,प्रदीप रामटेके यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रजत मोहोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळावा कार्यक्रमचे अध्यक्ष पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष तथा दैनिक संपादक निलेश सोमाणी(सत्कारमूर्ती)हे होते तर उद्घाटक तथा सत्कारमूर्ती म्हणून आमदार करण देवतळे होते.मोहोत्सवाचे मुख्य मार्गदर्शक तथा सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पाणसे हे होते.

विशेष अतिथी म्हणून भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर,प.स.भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सकपाळ,दैनिक महासागरचे जिल्हा संपादक प्रविण बदकी,मानवाधिकार साहाय्यता संस्थानचे जिल्हाध्यक्ष विनायक गरमडे,प्रकाश देवतळे,(प्रदेश उपाध्यक्ष महा.प्रांतिक तैलिक माहासंघ),महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष अनुपकुमार भार्गव हे होते.या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रजत मोहोत्सव समारंभ व पदाधिकारी मेळाव्याला पत्रकार बंधुंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.यामध्ये चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,संघटक विलास मोहिनकर,सहसंघटक उपक्षम रामटेके,तालुका सदस्य सुनील हिंगणकर,रामदास ठुसे,रोहित रामटेके व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

पूर्व विदर्भातील मच्छिमार समस्यांबाबत आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि 02 : खा-या पाण्यातील …

वडकी पोलिसांची धडक कारवाही अवैध गोवंश्याचे दोन ट्रक ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- आज रोजी पो.स्टे.वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved