खडसंगी येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव
श्री संताजी तेली समजाचे दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचा ४०० वा पुण्यतिथी महोत्सव व समाज प्रबोधन व मार्गदर्शन सोहळा दि. १ व २ फेब्रुवारी ला मां. मानिकादेवी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची सुरुवात दिनांक १ जानेवारी शनिवार ला ग्रामसफाई ने करण्यात आली असून, सकाळी. १०.०० वा घटस्थापना व भजन सकाळी ११.०० वा बाल संस्कार कॉन्व्हेन्ट येथील महिलाचां हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला. तर सायंकाळी ६.०० वाजता गावातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाने नागरीकांना रुजविले.
दिनांक २ जानेवारी रविवारला सकाळी ७.३० वाजता संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शोायात्रा रॅली काढण्यात आली. या रॅलीत भजन दिंडीने खडसंगी नगरी दुमदुमली. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व सत्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून विदर्भ तेली समाजाचे प्रशांत कामडे, हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विठल निकुरे, धनराज मुंगले, गजानन भजभुजे, डी. के. निकूरे, अभिनय लाकडे, सरपंच प्रियंका कोलते आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. दुपारी ४ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. तर सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी तेली समाजाचे राकेश नागोसे, पपिता नागोसे, आर्या नागोसे, योगेश नागोसे, नरेश मोहटे, हरी कामडी, संजय गिरडे, मदन तराळे, रुद्राक्ष नागोसे, यश नागोसे, जनार्धन तराळे, दिलीप सातपैसे, रुपेश समर्थ, गुणवंत नागोसे, आदी तेली समाजाचे समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.