जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
पांढरकवडा :- हैदराबाद रोडवरील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील ढाब्यांवर बेकायदेशीरपणे आणि छुप्या पद्धतीने गोमांस आणि दारूची विक्री केली जात आहे. केळापूर तालुक्यातील नागरिकांनी २७ जानेवारी रोजी आमदार राजू तोडसाम यांना निवेदन देऊन अवैध धंदे सुरू असलेले ढाबे बंद करावेत,अशी मागणी केली होती. केळापूर तालुक्यातील पांढरकवडा ते पाटणबोरी रस्त्यावरील काही ढाब्यांवर गोमांस, अवैध दारू व गांजा यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारू पिऊन मटका जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दररोज मोहीम राबवत आहे.
या विशेष म्हणजे आमदार राजू तोडसाम यांनी गोमांस विक्री व अवैध दारू विक्रीवर बंदी घातली आहे.जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. पांढरकवडा व केळापूर तालुक्यातील काही ढाब्यांवर कच्च्या मांस व दारूची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे या सूचनांमध्ये म्हटले आहे. पण अद्यापही प्रशासनाकडून कार्यवाही होत्तांना दिसत नाही.
_अवैध गोमांस विक्री बंदीबाबत राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासनाने विशेष कार्यवाही करावी_
_आमदार राजू तोडसाम यांनी परिसरातील अवैध ढाबे बंद करण्यासाठी जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला कळविले आहे.याशिवाय राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.अवैध ढाबे बंद करण्याची मागणी करणारे पत्र देण्यात आले आहे._