जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी येथे महामुनी बुद्ध विहाराच्या आवारात ग्रा.प.चे सोलर बोर असुन त्याची योग्यरित्या जनतेला सेवा घेता यावी करीता विहार समितीद्वारे मागील काही वर्षापासून ग्रा.प. ला विनंती अर्ज करण्यात आले परंतु ग्रा.प. तर्फे वेगवेगळी थातुरमातुर कारणे देऊन सोलर बोर व्यवस्थित ठिकाणी लावणे बाबत टाळाटाळ करण्यात आली.दि.4 फेब्रुवारी 2025 ला ग्रा.प.ला अचानक कामाचा कळवळा दाटून आला व बौद्ध विहाराच्या सदस्य यांना कुठलीही लेखी किंवा तोंडी माहिती न देता काम करण्याच्या नावाखाली विहाराची जाळी कापण्यात आली व तशीच खुली सोडण्यात आली.
या मनमानी कारवाई बद्दल विचारणा करण्यासाठी सरपंच रेखा पिसे यांना संपर्क केला असता त्यांनी बौद्ध बांधवांना ग्रा.प.ला येण्यास सांगितले सांयकाळी पावने सात वा पासुन ते साडे सात वाजे पर्यंत बौद्ध बांधव ग्रा.प. मध्ये सरपंचाची वाट बघत राहिले संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सरपंच रेखा पिसे यांनी फोन ऊचलने बंद केले व ग्रा.प. ला सुद्धा आल्या नाहीत अशा पद्धतीने त्यांनी बौद्ध बांधवांना त्रास दिला.काम करून देण्याच्या नावाखाली ही कारवाही बौद्ध विहाराच्या मालमत्तेची नासधुस रमाई जयंतीच्या कार्यक्रमात खोडा निर्माण व्हावा हे सर्व हेतुपुरस्सर विशिष्ट समुहाला खुश करण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.तरी सरपंच रेखा पिसे यांनी याबाबत उत्तर सादर करावे आणि त्यांच्यावर कारवाही करण्यात यावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बौद्ध समाज बांधव करीत आहेत.