जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने शासनाच्या महसूलाची दिवस रात्र सर्रास चोरी सुरु असल्याने जिल्ह्यात सर्वत्र धाडसत्र सुरु आहे.महसूल पथक या रेती माफियांनवर कारवाई करण्यासाठी सक्रियता दर्शवीत असून त्यांचेवर सुद्धा माफियांचे हल्ले होतांना दिसून येत आहे.
वरोरा तालुक्यात आताच दोन घटना घडल्या असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे.म्हणून दिनांक. ०४ फेब्रुवारी २०२५ ला महसूल पाथकांनी मिळून सापळा रचून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या अनेक हायवा वाहनांवर कारवाई केली. हि कारवाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तथा तलाठी यांनी सामोहिक रित्या केली असून या कारवाईमुळे जिल्ह्यात रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.