जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि प प्राथमीक शाळा दापोरी (कासार) केंद्र धानोरा येथे दि,4/1/25 ला संपन्न झाली या शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून विशाल खत्री (आयएएस) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी राळेगाव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, त्याचप्रमाणे शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, त्याचप्रमाणे विशेष अतिथी राजू काकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राळेगाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशोर भाऊ फीसके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दापोरी (कासार), प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल भाऊ जयपुरकर सरपंच जागजई , संजय झीलपे सचिव ग्रामपंचायत जागजई , संजय कारवटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरा तथा अध्यक्ष राळेगाव तालुका शाळा व्यवस्थापण समिती, रमेश सातघरे,प्रमोद आंबटकर पोलीस पाटील दापोरी कासार,सुभाष पारधी केंद्रप्रमुख धानोरा, व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले शिक्षण परिषदेचे उद्घाटन विशाल खत्री आयएएस
सहाय्यकजिल्हाधिकारी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पारधी केंद्रप्रमुख धानोरा यांनी केले तर सूत्रसंचालन नीलिमा पाटील मुख्याध्यापिका दापोरी कासार यांनी केले व आभार आकाश देशमुख मुख्याध्यापक रानवड यांनी मानले,एक शिक्षकी शाळा कशी असावी याचा आदर्श उदाहरण म्हणजे नीलिमा पाटील मॅडम यांची दापोरी येथील शाळा आदर्श शिक्षक कसा असावा आदर्श शाळा कशी असावी, (प्रयत्न वाळूचे तेलही रघडे) या मनी नुसार यांनी आपली लहान शाळा अतिशय सुंदर आकर्षक व गुणवत्तेच्या बाबतही दर्जेदार बनविली.असे गौरवोद्गार विशाल खत्री यांनी काढले,त्याप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रशांत गावंडे यांनीही भरभरून कौतुक केले, शाळा ही आकर्षक सुंदर तर आहेच परंतु गुणवत्तेतही अतिशय चांगल्या प्रकारची आहे व सर्वांगीण विकास साधत असताना शाळेने विकास करा, कसा करावा याचे उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे नीलिमा पाटील मॅडम अशी स्तुती केशव पवार गटविकास अधिकारी यांनी केली हे मात्र विशेष.