जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या वार्षिक घोडा रथ यात्रा नवरात्री महोत्सवाची सुरुवात मिती माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक 2 फरवरी 2025 पासून सुरुवात झाली असून दिनांक 2 फरवरीला मंडप पूजा करण्यात आली. मिती माघ शुद्ध सप्तमी ला रथ सप्तमी निमित्त दिनांक 4 फरवरी 2025 रोजी श्रीहरी बालाजी महाराज यांच्या रथाचे पूजन करण्यात आले.
मिती माघ शुद्ध नवमी दिनांक 6 फरवरीला रात्री 10 वाजता गरुड वाहन चिमूर नगरीची परिक्रमा पूर्ण करून श्रीहरी बालाजी महाराज यांना मार्गावरील अडथल्या बद्दल माहिती देतील अशी आख्यायिका आहे. हरी भक्त परायन स्नेहल पित्रे यांचे नारदीय कीर्तनानंतर रात्री 10 वाजता आज होणाऱ्या गरुड वाहन परिक्रमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट चिमूर तर्फे करण्यात आले.