जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथे आश्रम शाळेच्या गेट जवळ रस्त्यावर विद्युत पोल, तार बंडल व इतर साहित्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर पल्टी झाला.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रॉली नं.MH 33 G 2412 असुन ट्रॅक्टरवर बसून असणारे मजुर थोडक्यात बचावले.
हा ट्रॅक्टर चिमुर वरून शंकरपुर कडे जात होता.चिमुर-कान्पा रोड चे काम सुरू आहे व एका बाजुचे खोदकाम करून असल्याने समोरून येणाऱ्या वहनाला साईड देण्यासाठी ट्रॅक्टर खाली उतरवित असताना ट्रॅक्टर ची ट्रॉली पल्टी झाली.यावेळी बघ्यांची गर्दी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावार गोळा झाली आहे.