भाविक भक्तांची मोठ्या संख्येने होणार गर्दी
वाहतूक व्यवस्थेत बदल, काही मुख्य मार्ग राहणार बंद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 10 फेब्रुवारीला चिमूर शहरातील ऐतिहासिक श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने चिमूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सुरळीत रहदारीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली असून सदर बदल हा 10 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजतापासून ते 11 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत राहणार आहे.
हजारे पेट्रोलपंप चिमूर ते सरकारी दवाखाना चिमूर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार, आवश्यकतेनुसार सदर कालावधीत अधिसूचनेत काही प्रमाणात बदल करण्यात येईल.वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
भिसी ते चिमूर-वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा अवलंब करावा, जांभुळघाट ते चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा, नेरी वरून चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर-भिसी ला जाण्यासाठी जांभुळघाट-भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा व वरोरा कडून भिसी-जांभूळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगाव-कन्हाळगाव या मार्गाचा वापर करावा.वरील निर्देशाचे सर्व वाहतुकदारांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.