जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक १९/०२/२०२५ बुधवार ला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नेहरू चौक चिमूर तर्फे आयोजित करण्यात आली.
मुला मुलींनी केलेली वेशभुषा ठरले विशेष आकर्षण, ढोल ताशांच्या गजरात नेहरू चौक येथुन जय भवानी जय शिवाजी , हर हर महादेव च्या जय घोष देत मिरवणूक मुख्य मार्गाने निघाली व चिमूर शहरातुन मासळ रोड, वाल्मिकी चौक, मासळ चौक, बाजार चौक ते शिवाजी चौक आणि नेहरू चौक येथे रॅली संपन्न करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन म्हणून महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे डॉ. सतीश वारजुकर होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजयपाटील गावंडे, गजानन बुटके, विनोद ढाकोणकर, किशोर सिंगरे, गोपाल झाडे, जावा शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विपुल बुटके व उत्सव समीतीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन खूप मेहनत घेतली.