Breaking News

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर, दि. 20 : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.

आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालय हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यासोबतच महसूल व वने, मृद व जलसंधारण विभागासंदर्भातील विविध विषयांवर बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved