चौकाला नाव देऊन केली शिवजयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पिएचसी चौकात अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटवून मोकळा श्वास चौकाला देऊन काही दिवसांपूर्वी ठराव पारीत करून सदर चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करीत दि 19 फ्रेबु ला शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करीत शिव जयंती साजरी केली मोट्या उत्साहाने सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत महाराजांना अभिवादन केले.
नेरी ग्रामपंचायतीने शहराच्या मुख्य चौकाचे सौदर्याकरण करण्यासाठी आणि चौकाचा विकास साधित नेरी गावाचा लौकिक वाढविण्यासाठी कायदेशिर कारवाई करीत 27 जाने ला या चौकातील असंख्य वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटवित चौकाला मोकळे करीत मोकळा श्वास दिला तसेच या चौकात मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचे ठरवून चौकाला महाराजांचे नाव देण्याचे ठराव एकमताने पारीत करीत दि 19 फेब्रु ला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमांची विधिवत पूजा अर्चा करून महाराजांची जयंती साजरी केली आणि चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला सरपंच रेखा नानाजी पिसे, उपसरपंच चंद्रभान कामडी, सदस्य संदीप पिसे, पिंटू खाटीक, निखिल पिसे, संगीता कामडी, पद्मश्री नागदेवते, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष्या मायाताई नन्नावरे, व्यापारी युनियन अध्यक्ष रवींद्र पंधरे तथा नेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्थव कमेटीचे सदस्य आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते तसेच पेठ वार्ड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली डीजे ढोल ताश्या च्या निनादात आणि जयघोषात मिरवणूक बाजार चौकात सांगता करण्यात आली सदर शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांनी महाराजांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकीत उपस्थित जनसमुदायला संबोधित केलेअल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.