जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- पांढरकवडा नगरपरिषद मुख्याधिकारीच्या दलनात बॅनर बद्दल विचारणा करणारा गेलेल्या तरुणाला मुख्याधिकाऱ्याने शिवीगाळ करत हाकल्ल्याने युवकाने नगरपरिषदेच्या गेटवर पॉयझन घेऊन आत्महत्येचे प्रयत्न केले व त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते..
अशोक रामलू चिट्टलवार नामक इसमाचे नावे न. प. चे मानव पुरवठ्याचे कंत्राट होते त्याचे देयक अदा करण्याकरता मुख्याधिकाऱ्याने त्याला लाचेची मागणी केली असता ती अशोक याने दिले नाही.
काल दि. 15 रोजी अशोक हा नवीन कंत्राट बद्दल माहिती घेण्याकरिता नगरपरिषद येथे मुख्याधिकारी दालनात गेले असता मुख्याधिकारी ने त्याला शिवीगाळ करत मला पैसै आणुन दे अथवा तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो तुला मजुरांच्या हाताने मारुन टाकण्याची थमकी दिली.
अशोक ला हा अपमान सहन न झाल्याने तो नगर परिषद च्या आवारात उंदीर मारण्याचे कमांडो हे औषद प्राशन करुन आत्महत्येचे प्रयत्न केले. त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे नेले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.
बातमी लिहेपर्यंत अशोक यांना सावंगी मेघे येथे नेले असल्याचे कळले व त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले.