अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की महाशिवरात्री 26/2/25 पासून हनुमान जन्मोत्सव पर्यंत शेवगाव मधील प्रत्येक मंदिरात दररोज रात्री 8:30 ते 10 या वेळेत होणार असून सर्वांनी या हनुमान चालीसा साठी जास्तीत जास्त संख्येने यावे असे हनुमान चालीसा सत्संग मंडळ यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.जय श्रीराम श्रीराम भक्त हनुमान आणि जगत जननी गोमाता यांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गोसेवार्थ सामूहिक हनुमान चालीसा पाठ येत्या 26/2/25 महाशिवरात्री पासून दररोज आपल्या शेवगाव च्या पावन भूमीत प्रत्येक मंदिरात सुरुवात होत असून आपण सर्वांनी प्रभू रामचंद्रजी यांना अतिप्रिय असणारे भक्त हनुमानजी यांच्या हनुमान चालीसा साठी येवून भगवत नामाच्या कुंभ स्नानात आंघोळ/ गोते/ डुबकी घ्यावी. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या.
*ताजा कलम*
*शेवगाव शहरामध्ये 12 वर्षापासून गोसेवार्थ सामूहिक हनुमान चालीसा पाठ हनुमान चालीसा सत्संग मंडळ यांच्या वतीने यातून शेवगाव मधील भक्तांकडून गोमाता चारा साठी पावती किंवा दानपेटी मधील जमा होणारा निधी आम्ही गोमातेच्या चाऱ्या साठी वापरतो…त्या निधीचा चारा घेवून आम्ही गोशाळेला देतो. असे आवाहन या वेळी हनुमान चालीसा सत्संग मंडळ गो-सेवक यांनी केले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*