ज्वाला समाचारच्या सर्व वाचकांचा मनःपुर्वक आभार
jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar.
jwalasamachar. jwalasamachar.
jwalasamachar. jwalasamachar
jwalasamachar. jwalasamachar.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नविन युगात अजूनही काही लोक पडतात अंध श्रद्धेला बळी. याचाच फायदा घेत काही २०२४ मध्ये भामट्यांनी ७.९१ लाखांनी फसविले मात्र वर्षभरानंतर चिमूर पोलीसांना आरोपीस पकडण्यास आले यश. सविस्तर असे की जानेवारी २०२४ मध्ये चिमूर तालुक्यात ४ ते ५ भोंदू फकीर भविष्यवाणी सांगण्याचे आमिष दाखवून फिरत होते. भविष्य सांगून अनेक कुटुंबीयांची पूजाअर्चा करण्याच्या नावाखाली पैशाची लूटमार केली. अशातच ते वाघेडा येथील ज्योत्स्ना अनिल मेश्राम या महिलेच्या घरी गेले.
फकिरांनी भविष्य सांगताना कुटुंबावर संकट आले आहे. तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि मुलगा व मुलीचे निधन होईल असे खोटेनाटे भामट्यांनी सांगितले व महिलेला पूजापाठ करण्याच्या नावाखाली ७ लाख ९१ हजार ६०० रुपयांनी गंडविले आणि पसार झाले. भामटे पूजेसाठी आले नसल्याने आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच पोलीस स्टेशन गाठले व महिलेने तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरविली मात्र आरोपी हाती लागले नाही. तब्बल एक वर्षानंतर नागभीड येथील गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलिसांच्या जाळ्यात आरोपी अडकले. चारही आरोपींना चंद्रपूर येथून अटक करून नागभीड पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असतांना पोलिसांनी खाक्या दाखविताच चार आरोपींपैकी एकाने वाघेडा येथील लूटमार प्रकरणाचा गुन्हा कबूल केला आणि इतर आरोपींची नावे सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई चिमूरचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तब्बल एका वर्षानंतर आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने पीडित महिलेला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.