jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर प्रादेशिक वन विभागाच्या वनपरिक्षेत्र मुरपार वनक्षेत्र अंतर्गत मिंझरी बीटातील शेतशिवरातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. चिमूर तालुक्याला ताडोबा व्याघ्र प्रकल्प लागून असून, शेत शिवार असो की गावात असो वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य प्राणी भरदिवसाच पाहायला मिळत असते. त्यामुळं हा नित्याचाच झाला आहे. यातच मिंझरी गावाजवळील प्रकाश पोहनकर यांचे शेत आहे. यांच्या शेतात विनाकठड्याची विहीर असून, या विहिरीत हा बिबट्या मृत अवस्थेत सोमवारी सकाळी जवळपास ८ वाजताच्या दरम्यान आढळला आहे. जवळपास दोन दिवसापासून हा बिबट सावजची शिकार करायला गेला असता विहीरीत पडला असून त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष वन विभागाकडून लावण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी पोहनकर यांचा शेतावर काम करणारे प्रभू गायकवाड हे शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी आली. त्यामुळे ते विहिरीकडे गेले. अन् वाकून पाहिले असता विहिरीत बिबट मृतावस्थेत तरंगताना दिसून आला. याची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली.
यावेळी प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनपाल यु. बी. लोखंडे, वनरक्षक रुपेश केदार, सरला भिवापुरे, एनजीओ प्रतिनिधी अमोद गौरकर, विजय गजभे, यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर खडसगी येथील शासकीय विश्रामगृह येथे पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ.सतीश तांबे,डॉ.श्रद्धा लोढे,डॉ.ममता वानखेडे,डॉ.निशा आकरे, यांनी शवविच्छेदन केले असून, सर्व अवयव शाबूत होते.तर काही अवयव काढून पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पशू वैद्यकिय अधिकारी सर्व टीम, एनजीओ प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थित बिबट्याला शासकिय विश्रामगृहाच्या परिसरातच जाळण्यात आले.